This Is The Richest Star In The Kapoor Family : कपूर कुटुंबीय हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध कुटुंब आहे. कपूर घरातील अनेक जणांनी आजवर बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत काम करत पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दिवंगत पृथ्वीराज कपूर, राज कपूर, ऋषी कपूर यांच्यापासून ते करिश्मा कपूर, करीना कपूर रणबीर कपूरपर्यंत सगळ्यांनी विविध चित्रपटांत काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

करीना कपूर व रणबीर कपूर सध्याच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहेत, पण इतके दिग्गज कलाकार असलेल्या कपूर कुटुंबातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग जाणून घेऊयात… आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडस्ट्रीत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या करिश्मा व करीना कपूर कुटुंबातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती नाहीत.

‘ही’ आहे कपूर कुटुंबातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

करीना-करिश्मा यांच्याबरोबर रणबीर कपूरही कपूर कुटुंबातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीये, तर कपूर कुटुंबातील सध्याच्या घडीतील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे आलिया भट्ट कपूर. ऋषी कपूर व नीतू कपूर यांची सून आणि रणबीर कपूरची बायको. अभिनेत्री आलिया भट्ट कपूर कुटुंबातील सध्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे.

‘GQ’च्या वृत्तानुसार निर्माती, अभिनेत्री आणि आता उद्योजिका आलिया भट्टची नेटवर्थ ही ५५० कोटी रुपये इतकी आहे. ती Ed-a-Mamma या ब्रँडची सहसंस्थापिकाही आहे, ज्याची नेटवर्थ १५० कोटी इतकी आहे. आलिया भट्टने तिची बहीण शहीन भट्टबरोबर त्यांची इटरनल सनशाइन ही निर्मिती संस्थाही सुरू केली आहे. २०२२ मध्ये त्यांनी ‘डार्लिंग’ चित्रपटाची निर्मितीही केली होती.

आलिया सध्याची बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ९-१५ कोटी रुपये इतकं मानधन घेते. या व्यतिरिक्त करीना कपूरबद्दल बोलायचं झालं तर तिची नेटवर्थ ५०० कोटी रुपये इतकी आहे; तर रणबीर कपूरची नेटवर्थ ही जवळपास ३४५ कोटी रुपये इतकी आहे.