आज भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे अनेक शहरांमध्ये निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य माणसांपासून कलाकारांपर्यत प्रत्येक जण देशभक्तीच्या रंगात रंगलेले दिसून येत आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
बॉलीवूडचे महानायक अभिताभ बच्चन यांनी खास अंदाजात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन दिव्यांग मुलांबरोबर दिसून येत आहेत. सर्व मुले सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत गात आहेत. अमिताभ बच्चन त्यांच्याबरोबर सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा’ अशी कॅप्शनही दिले आहे.
अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत बिग बी यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले “आम्हाला तुमच्याबद्दल विशेष आदर आहे.” तर दुसऱ्याने “तुम्ही पुन्हा एकदा आमचे मन जिंकले. तुम्ही खरंच इतरांपेक्षा वेगळे आहात.” अशी कमेंट केली आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा-“देशात रामराज्य…” सचिन, बिग बी व इतर सेलिब्रिटीजचा जुना व्हिडीओ शेअर करत कॉमेडीयनची खोचक टिप्पणी
अमिताभ बच्चन यांच्याशिवाय करीना कपूर, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, कंगना राणौत, अनुपम खेर यांनीही भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडबरोबर साऊथच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
