गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेची धामाधूम पाहायला मिळत आहे. काल उपांत्य फेरीमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या विक्रमी खेळीमुळे त्यांच्या संघाला विजय मिळाला. आजच्या भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीतल्या दुसऱ्या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार यावर आता जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.

भारतीय संघाने आजच्या सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव केल्यास विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येऊ शकतात. असे घडून २००७ च्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती व्हावी अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची इच्छा आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते भारतीय संघाला संबोधून एक कविता म्हणत आहेत. ते म्हणतात,
“ए निली जर्सी वालो
१३० करोड सपनो के रखवालो,
दिखा के जस्बा लहरा दो तिरंगा..
इस बार फिरसे विश्वकप उठालो ए निली जर्सी वालो…

तुम्हारी बल्लेबाजी के सामने
कौन है जो झुका नही हैI
भेद सके जो गेंदबाजी तुम्हारी
एसा बल्ला बना नही हैI
तुम बस अपनी मेहनत का सिक्का उछालो ए निली जर्सी वालो…

माना के ये इम्तिहान बडा है,
लेकीन तुम्हारे पिछे पुरा हिंदुस्तान खडा हैI
एक बार हमे फिरसे २००७ की खुशी लौटा दो,

ए निली जर्सी वालो, १३० करोड सपनो के रखवालो
इस बार फिरसे विश्वकप उठालो…”

आणखी वाचा – “वडिलांना जातीच्या…”; अमिताभ यांनी सांगितला ‘बच्चन’ आडनावामागचा किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे भारताचे आघाडीचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. उपकर्णधार केएल राहुलने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केल्याने त्यालाही सूर गवसला आहे असे म्हटले जात आहे. रोहित शर्माच्या खेळाबद्दल सध्या भारतीय संघाला चिंता आहे. आजच्या सामन्यामध्ये फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि डावखुरा अक्षर पटेल यांची सामन्यात निवड झाल्यास त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.