बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. अलानाने बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेसह मुंबईत लग्नगाठ बांधली. अलानाच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

अलाना ही अनन्या पांडेची चुलत बहीण आणि चंकी पांडे यांची पुतणी आहे. बहिणीच्या लग्नात अनन्याने ‘सात समुंदर पार मे तेरे’ या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे चंकी पांडेंनेही अनन्याबरोबर ठुमके लावले. ६०व्या वयातही चंकी पांडेचा डान्स पाहून उपस्थितही थक्क झाले. अलानाच्या लग्नातील अनन्या व चंकी पांडे या बापलेकीच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> “कंगना रणौतचे चित्रपट बघता का?” कौतुकाचा वर्षाव करत संजय राऊत म्हणाले, “ती एक…”

हेही वाचा>>स्वरा भास्कर-फहाद अहमदच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो व्हायरल, अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

लग्नातील चंकी पांडेच्या डान्सचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. अनन्या व चंकी पांडेंचा हा व्हीडिओ एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>> प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्यावर जीममध्ये हल्ला, चाकूने केले वार; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनन्याने बहिणीच्या लग्नात डिझायनर साडी नेसून ग्लॅमरस लूक केला होता. तर चंकी पांडेंनी हिरव्या रंगाचा सूट परिधान केला होता. अलानाच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.