अनिल कपूर हे बॉलीवूडमधील एक एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या फिटनेस आणि लाइफस्टाइलमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या व्यायामाच्या सवयीमुळे आताच्या अनेक तरुण अभिनेत्यांना टफ फाईट देताना दिसतात. आता त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

अनिल कपूर गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांचं फॅन फॉलोईंग खूप मोठा आहे. अनिल कपूर सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता त्यांनी त्यांचा जिम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत अनिल कपूर भावूक, म्हणाले, “माझा मित्र…”

अनिल कपूर फिटनेस फ्रिक आहेत. ते नेहमीच व्यायाम करत स्वतःला तंदुरुस्त ठेवत असतात. आता नुकताच त्यांनी एक त्यांचा व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ते ऑक्सिजन मास्क लावून ट्रेडमिलवर धावताना दिसत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करतात सोशल मीडियावर खूप चर्चेत आला.

हेही वाचा : Photos : नव्या वस्तूंना प्राचीन टच, ‘असं’ आहे अनिल कपूर यांचं घर, पहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनिल कपूर यांच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं पण अनेकांनी त्यांना ट्रोल केलं. एकाने लिहिलं, “एवढी ऑक्सिजनची गरज आहे तर पळताय कशाला?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “काय गरज हे सगळं करायची?” तर आणखी एकाने लिहिलं, “श्रीमंत लोकांचे नखरे बघा!” तर आणखी एकजण म्हणाला, “मी तर १३ किलोमीटर विना ऑक्सिजनचा पळू शकतो.” त्यामुळे आता अनिल कपूर यांच्या या व्हिडीओमुळे सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा त्यांच्या व्यायामाच्या सवयीकडे वळलं आहे.