scorecardresearch

Premium

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’चा बॉक्स ऑफिसवर डंका; दहाव्या दिवशी केली रेकॉर्डतोड कमाई, एकूण कलेक्शन ‘इतके’ कोटी

Animal Box Office Collection Day 10: ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने दहाव्या दिवशी किती कमाई केली? घ्या जाणून

Animal Movie box office collection day 17
अॅनिमल बॉक्स ऑफिस कलेक्शन

रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरचे हिंस्त्र रूप बघायला मिळत आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, शक्ती कपूर, तृप्ती डिमरी हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता ‘अ‍ॅनिमल’च्या दहाव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘अ‍ॅनिमल’ने दहाव्या दिवशी ७.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. देशभरात या चित्रपटाने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे, तर जगभरात या चित्रपटाने ७०० कोटींची कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत ‘अ‍ॅनिमल’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’, ‘जवान’बरोबरच प्रभासच्या ‘बाहुबली २’ चित्रपटालाही मागे टाकले आहे.

Fighter box office collection
‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; दुसऱ्या दिवशी चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी
Malaikottai Vaaliban box office collection day 2 sonalee kulkarni mohanlal earnings
सोनाली कुलकर्णीच्या ‘या’ मल्याळम चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
Love and War
संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झळकणार रणबीर- आलिया आणि विकी कौशल, नाव अन् प्रदर्शनाची तारीखही ठरली
kangana ranaut announce release date of emergency
अखेर मुहूर्त मिळाला! कंगनाचा बहुप्रतिक्षित ‘इमर्जन्सी’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

‘अ‍ॅनिमल’ चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी चित्रपटगृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहेत. प्रदर्शनाअगोदरच ॲडव्हॉन्स बुकिंगमधून ‘अ‍ॅनिमल’ने मोठी कमाई केली होती. भारताबरोबरच परदेशातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसांत चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढतच गेल्याचे दिसून येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Animal box office collection day 10 ranbir kapoor film earn 700 crores dpj

First published on: 11-12-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×