कार्तिक आर्यनच्या ‘भूल भूलैया ३’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२२मध्ये प्रदर्शित झालेला कार्तिक व कियारा अडवाणीचा ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर गेल्यावर्षी २०२३मध्ये ‘भूल भुलैया ३’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटाविषयी चर्चा रंगली आहे. अनीज बज्मी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

नुकतंच अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. “मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परत येत आहे. मी विद्या बालन हिचं स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. ‘भूल भूलैया ३’ यंदाच्या दिवाळीत धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे,” असं कॅप्शन लिहित कार्तिक आर्यनने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये विद्या बालन आणि कार्तिक ‘मेरे ढोलना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
sanket korlekar sister uma debut on star pravah new serial sadhi mansa
‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत झळकली प्रसिद्ध अभिनेत्याची बहीण; फोटो शेअर करत म्हणाला, “तू पहिल्यांदा टीव्हीवर…”

आणखी वाचा : १३ वर्षांपासून रखडलेल्या ‘या’ चित्रपटात सलमान खान व कपिल शर्मा एकत्र येणार; सोहेल खानने केली मोठी घोषणा

विद्याला पुन्हा या भूमिकेत पाहून प्रेक्षक फारच खुश झाले आहेत. अन् आता याबरोबरच या चित्रपटातील आणखी एका अभिनेत्रीबद्दल नवी माहिती समोर आलेली आहे. कार्तिक आर्यन आणि विद्या बालन पाठोपाठ आता ‘भूल भूलैया ३’मध्ये ‘अॅनिमल’फेम तृप्ती डीमरीची एंट्री झाली आहे. एका हटके पद्धतीने कार्तिक आर्यनने तृप्ती या चित्रपटा दिसणार असल्याची घोषणा केली आहे. वेगवेगळे तुकडे असलेले पझल एकत्र जोडून नंतर एक वेगळी स्वतंत्र पोस्ट करत तृप्तीदेखील या चित्रपटात झळकणार असल्याचं कार्तिकने त्याच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.

अद्याप अनीस बाजमी यांनी चित्रीकरणाची तारीख निश्चित केलेली नाही पण लवकरच ‘भूलभूलैया ३’चे चित्रीकरण सुरू होणार असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूल भूलैया’मध्ये अक्षय कुमारसह विद्या बालन मंजुलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. पण चित्रपटाच्या दुसऱ्या भागात अक्षयची जागा कार्तिक आर्यनने घेतली. तर तब्बू व कियारा अडवाणी या दोघी प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. आता तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन, विद्या बालन व तृप्ती डीमरी नेमकी काय धमाल करणार हे पाहण्यासाठी सगळेच फार उत्सुक आहेत.