हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनीही त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहीत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. आता अशातच अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे खूप जवळचे मित्र होते. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी एकत्रच शिक्षण घेतलं. अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री आहे. काही महिन्यांपूर्वी ते दोघं ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या दिवसांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला होता. तर त्यावेळी “अनुपम खेर यांनी माझ्याकडून यांच्याकडून पैसे उधार घेतले होते,” असा खुलासाही सतीश कौशिक केला होता.

आणखी वाचा : Satish Kaushik Passes Away : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन, अनुपम खेर यांनी ट्वीट करत दिली माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीश कौशिक म्हणाले होते, “नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकत असताना अनुपमची तपकिरी रंगाची दाढी होती आणि तो अगदी परदेशी दिसायचा. त्यामुळे त्याला नेहनीच पैशाची चणचण भासायची. आमच्या हॉस्टेल आणि स्कूलच्या वाटेत एक फळवाला होता. पण अनुपम सरळ रस्त्याने स्कूलला न जाता लांबच्या रस्त्याने जायचा, कारण फळवाला त्याला बघेल आणि त्याच्याकडून राहिलेले पैसे मागेल. त्याने माझ्याकडूनही ८० रुपये उधार घेतले होते. जे त्याने मला परत केले नाहीत. तेव्हा मी त्याला दम देऊन पैसे परत मिळवायला गेलो होतो. तेव्हा तो मला म्हणाला होता की, माझ्याकडे ६० रुपये आहेत तितके घे, उरलेले २० रुपये मी आत्ता देऊ शकत नाही.”

हेही वाचा : अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; मालकीचं घर सहज शक्य असूनही, कारण…

त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. तर य व्हिडीओवर कमेंट्स करत चाहते त्यांची मैत्री आवडल्याचं सांगत आहेत. त्याचबरोबर सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत आहेत.