Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन झालं असून प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. राम मंदिरातील रामाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन झालं आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत पोहोचले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्यातील या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावेळी प्रसिद्ध गायकांच्या आवाजातील राम भजनांत अयोध्यानगरी दंग झालेली पाहायला मिळाली. याचे व्हिडीओ नुकतेच सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी प्रसिद्ध गायकांनी राम भजन गायले. अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, सोनू निगम यांच्या सुमधूर आवाजात रामभक्त दंग झाले होते. यामुळे रामभक्तांचा उत्साह वाढला. याचे व्हिडीओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेसह इतर एंटरटेनमेंट वृत्तसंस्थेने शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: झेंडा नाचवत, जय श्रीरामाचा जयघोष करत अभिनेत्याचा डान्स; नेटकरी म्हणाले, “क्या बात है..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अयोध्येतील या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रोहित शेट्टी, आयुष्मान खुराना, राजकुमार हिरानी, विक्की कौशल, कतरिना कैफ, कंगना रणौत, मधुर भांडारकर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. पण अक्षय कुमार, टायगर श्रॉफसह काही सेलिब्रिटी गैजहजर आहेत.