गेल्या काही वर्षात अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण यांसारख्या अभिनेत्री हॉलिवूड चित्रपटांमध्येही झळकताना दिसल्या. तसंच या दोघींप्रमाणे अनेक अभिनेत्रींची मोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सने त्यांची ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. यात आता अभिनेत्री अनुष्का शर्माचा समावेश झाला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये आपल्याला दिसली. ती काही भारतीय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडरही आहे. गेली काही वर्ष ती चित्रपटसृष्टी पासून दूर आहे. परंतु तसं जरी असलं तरी ती जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. अशातच अमेरिकेतील लोकप्रिय ब्रँड मायकल कोर्स याने अनुष्का शर्माला आपले भारतातील ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे.

हेही वाचा : नसीरुद्दीन शाह यांची सून होणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री? प्रतिक्रिया देत म्हणाली, “त्या कुटुंबाने मला…”

मायकल कोर्स हा अमेरिकेतील सुप्रसिद्ध मायकल कोर्स या फॅशन डिझायनरने तयार केलेला ब्रँड आहे. हा ब्रँड महिला आणि पुरुषांसाठी घड्याळ, फुटवेअर, ज्वेलरी अशा विविध गोष्टींची निर्मिती करतो. आता या ब्रँडला भारतातही आपला जम बसवायचा आहे. त्यामुळे त्याने लोकप्रिय अनुष्का शर्मा हिची आपल्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी निवड केली आहे.

नुकताच अनुष्काने या ब्रँडशी करार केला आहे. आता ती आपल्याला या ब्रँडच्या घड्याळांची जाहिरात करताना दिसेल. इतक्या लोकप्रिय ब्रँडची ब्रँड अॅम्बेसिडर बनल्याने अनुष्का खुश आहे.

आणखी वाचा : Photos: अनुष्का शर्मा वामिकासह पोहोचली कोलकाता येथील कालीघाट मंदिरात, घेतले काली मातेचे दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अनुष्का यापूर्वी ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. तर आता पुन्हा एकदा ती मोठ्या पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटात ती आपल्याला दिसेल. हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित आहे. यात ती प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे काम सुरू असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.