अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पती क्रिकेटपटू विराट कोहली आणि लेक वामिका यांच्याबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याशिवाय ती काही सुविचार आणि तिच्या आयुष्याशी मिळत्या जुळत्या पोस्ट दिसल्या तर त्याही शेअर करत असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामला स्टोरी टाकली आहे. यातून तिने तिची व्यथा मांडण्याचा मजेशीर प्रयत्न केला आहे.
वामिकाला झोपायचं नसलं तरी तिला झोपवावं लागतं आणि अनुष्काला झोपायचं असतं, पण वामिका झोपत नसल्याने तिलाही झोपता येत नाही. म्हणजे ज्यांना झोपायचं आहे ते ज्यांना झोपायचं नाही अशांना झोपवत असतात हे अनफेअर चुकीचं आहे, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
अनुष्काने अलीकडेच तिचा ‘चकदा एक्सप्रेस’चं शूटिंग पूर्ण केलंय. त्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत तिने पती आणि लेकीबरोबर दुबईत केलं. सध्या अनुष्का विराट आणि वामिकाबरोबर धार्मिक यात्रेवर आहेत. यावेळी त्यांनी बाबा नीम करोलीचे दर्शनही घेतले.