कुटुंबातील एखादी व्यक्ती सिनेसृष्टीत आली आणि तिने यश मिळवलं की त्या कुटुंबातील इतरही अनेक जण या क्षेत्रात नशीब आजमवण्यासाठी येतात. त्यापैकी काहींना यश मिळतं, तर काहींना नाही मिळत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. त्याचा मोठा भाऊ हिरो आहे, कालांतराने तोही भावाच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत आला. त्याने आमिर खानच्या ब्लॉकबस्टर ‘दंगल’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.

या अभिनेत्याचा अभिनयात येण्यापूर्वीचा प्रवास पाहिला तर तो उत्तम क्रिकेटपटू होता, तो क्रिकेटपटूच होईल आणि याच खेळात करिअर करेल, असं सर्वांना वाटलं होतं. कारण तो एका संघाचा कर्णधारही होता. पण त्याने आपला निर्णय बदलला आणि तो या सिनेइंडस्ट्रीत आला. आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे अपारशक्ती खुराना. तो अभिनेता आयुष्मान खुरानाचा धाकटा भाऊ आहे.

“मी तिला बेडरूममध्ये…”, अभिनेत्याचे त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “अतिशय अश्लील अन्…”

अपारशक्तीने २०१६ मध्ये ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अपारशक्ती एकेकाळी आरजे होता, त्याला सैन्यात जायचं होतं, पण तो अभिनेता झाला. त्याच्यात अभिनयाचे कौशल्य आहे आणि तो एक अतिशय प्रतिभावान अभिनेता आहे. तो हळूहळू बॉलीवूडमध्ये स्वतःसाठी एक स्थान तयार करत आहे. अपारशक्ती खुरानाने आरजे म्हणूनही काम केलं आहे.

“दुर्दैवाने आज ते घडलं…”, फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर शाहरुख खानची पोस्ट; म्हणाला, “तुम्ही संपूर्ण भारताला…”

अपारशक्ती खुराना हा एक चांगला क्रिकेटर आहे आणि तो एकेकाळी हरियाणा अंडर-१९ संघाचा कर्णधार होता. किशोरवयात अपारशक्ती खूप क्रिकेट खेळायचा, त्यामुळे तो क्रिकेटर होईल असं सर्वांना वाटायचं. त्याला सैन्यात जायची इच्छा होती, त्यासाठी त्याने प्रयत्नही केले होते, पण यश आलं नाही. नंतर त्याने करिअरबद्दलचा आपला विचार बदलला. अपारशक्तीने सहाय्यक भूमिकांमधून अभिनयात पदार्पण केलं, पण छोट्याशा भूमिकेतूनही तो लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपारशक्तीने आमिर खानच्या ‘दंगल’ या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने आमिर खानच्या पुतण्याची भूमिका साकारली होती. या सिनेमाने एकूण २२०७ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. यानंतर तो ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मध्येही दिसला होता. सुपरहिट हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘स्त्री’मध्येही अपारशक्तीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय ‘ज्युबली’ ही त्याची गाजलेली वेब सीरिज ठरली. या सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.