चित्रपटगृहांमध्ये दर शुक्रवारी अनेक लहान-मोठे चित्रपट प्रदर्शित होतात. त्यातले काही हिट होतात, काही बजेट वसूल करण्याइतकी कमाई करतात तर काही फ्लॉप होतात. असाच एक चित्रपट नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचं बजेट कोट्यवधींमध्ये होतं, पण तो एक लाख रुपयेही कमावू शकला नाही. या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे स्टार्स होते, पण त्यांनीही चित्रपटाचं प्रमोशन केलं नाही. कोणता आहे हा चित्रपट आणि या चित्रपटाने किती कमाई केली होती, जाणून घेऊयात.

एक बॉलीवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक लाख रुपये देखील कमवू शकला नाही आणि तो भारतातील सर्वात मोठा फ्लॉप ठरला. अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या यात मुख्य भूमिका होत्या. ‘द लेडी किलर’ असं या चित्रपटाचं नाव आहे, हा नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘बीए पास’, ‘सेक्शन ३७५’ आणि ‘ब्लर’चे दिग्दर्शन करणाऱ्या अजय बहलने या क्राईम थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

Video: आशा भोसलेंची नात ‘या’ ऐतिहासिक भूमिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण करणार, घोषणा होताच जनाईला अश्रू अनावर

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट ४५ कोटी रुपये होतं. इतक्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला ‘द लेडी किलर’ चित्रपटगृहांमध्ये अपूर्ण प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या शूट आणि निर्मितीत खूप वेळ गेला, पण तरीही तो पूर्ण होऊ शकला नाही. असं असूनही निर्मात्यांनी अचानक निर्णय घेतला आणि अर्जुन आणि भूमी स्टारर हा चित्रपट भारतभरात फक्त डझनभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला. ‘द लेडी किलर’ ची पहिल्या दिवशी फक्त २९३ तिकिटं विकली गेली, त्याची कमाई ३८ हजार रुपये होती. या चित्रपटाने एक लाख रुपयेही कमावले नाही. हा भारतातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला.

John Cena Oscar 2024: …अन् रेसलर जॉन सीना नग्नावस्थेत पोहोचला ऑस्करच्या मंचावर, पाहा व्हिडीओ

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. निर्मात्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह असलेल्या करारानुसार हा चित्रपट डिसेंबरमध्ये ओटीटीवर येणार होता. त्यामुळे निर्मात्यांनी अपूर्ण असूनही सिनेमा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मर्यादित चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे ‘द लेडी किलर’ अपूर्ण आणि कोणत्याही प्रमोशनशिवाय प्रदर्शित झाला, सर्वात मोठा फ्लॉप ठरला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सिनेमा अद्याप कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला नाही.