प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या तारकांनी हजेरी लावली. शाहरुखपासून सलमान, ऐश्वर्या, दीपिका-रणवीर, आलिया भट्ट, रेखा, सर्व ए-लिस्टर स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या इव्हेंटमध्ये सुहाना खान, आर्यन खानपासून ते अनन्या पांडेपर्यंत सर्व स्टार किड्स दिसून आले. मात्र, या सगळ्या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चा झाली ती आर्यन खान आणि अनन्या पांडेची. या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आर्यन आणि अनन्या एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

हेही वाचा- सलमान खान आणि ऐश्वर्या राय दिसले एकत्र? अनेक वर्षांनंतर दोघांना एकाच फोटोमध्ये बघून चाहते म्हणाले…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे तिची खास मैत्रीण सुहाना खानला भेटताना दिसत आहे. सुहानाच्या बाजूला गौरी खान आणि आर्यनही दिसत आहेत. यादरम्यान गौरी अनन्यासोबत हसताना दिसली पण आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करताना दिसला. अनन्यानेही आर्यनकडे दुर्लक्ष केले. या व्हिडीओमुळे दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, गौरी खानने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करून या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

हेही वाचा- Video : धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी, स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझे मित्र…”

गौरी खानने इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोत आर्यन खान त्याची आई गौरी खान, बहीण सुहाना आणि अनन्या पांडेसोबत पोज देताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या फोटोमध्ये आर्यनने अनन्याच्या कंबरेवर हात ठेवून फोटो क्लिक केला आहे. आर्यन खान या फोटोत खूपच गंभीर लुकमध्ये दिसत आहे. तर अनन्या हसताना दिसत आहे. या फोटोवरून दोघांमध्ये काहीच बिनसले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी माधुरी दीक्षितच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी आर्यन खानने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अनन्या पांडेही उपस्थित होती. या कार्यक्रमातील आर्यन आणि अनन्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात आर्यन खान या इव्हेंटमधून बाहेर जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे याच व्हिडीओमध्ये अनन्या पांडे त्याच्याकडे पाहताना दिसत आहे. पण इव्हेंटमधून बाहेर पडत असलेला आर्यन खान अनन्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तो तिच्याकडे न पाहताच घाईघाईत तिथून निघून जाताना दिसत आहे. या व्हिडीओवरून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याची चर्चा सुरू होती.