बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले. २५ मे रोजी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ यांच्याशी लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या पत्नीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दुसरी पत्नी रुपाली बरुआ यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या पत्नीचा मैत्रीण म्हणून उल्लेख केला आहे. या फोटोला त्यांनी “प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद मित्रा…अलशुकरण बंधू, अलशुकरण जिंदगी,” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, प्रार्थना बेहेरे कमेंट करत म्हणाली…

दरम्यान, आशिष विद्यार्थींनी ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याने त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी वयाच्या साठीत दुसरं लग्न करण्याचं निर्णय का घेतला, याबाबत सांगितलं होतं.

हेही वाचा>> “तुम्ही करोना होऊन मेलात तरी चालेल”, ‘त्या’ मराठी मालिकेमुळे निवेदिता सराफ झालेल्या ट्रोल, म्हणाल्या, “टीका करुन…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीचं नाव राजोशी उर्फ पिलू बरुआ असून या दोघांना अर्थ नावाचा २२ वर्षांचा मुलगादेखील आहे. गेल्यावर्षी त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.