बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘जवान’चित्रपटाने सर्व रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुख खानने अलीकडेच ट्विटरवर ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा : अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

शाहरुख खान वांद्रे पश्चिम येथे बँड स्टॅन्डजवळ ‘मन्नत’ नावाच्या आलिशान बंगल्यात राहतो. सामान्य माणसापासून ते मोठमोठ्या बॉलीवूड स्टार्सपर्यंत किंग खानच्या ‘मन्नत’ बंगल्याबद्दल सर्वांनाच आकर्षण वाटतं. अलीकडेच शाहरुखला त्याच्या एका चाहत्याने ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये ‘मन्नत’बद्दल प्रश्न विचारला.

हेही वाचा : “त्यांनी मला मारलंच असतं…”, अभिनेत्री होण्याआधी प्रार्थना बेहरे होती पत्रकार, संजय दत्तला विचारलेला ‘तो’ प्रश्न, म्हणाली…

“‘मन्नत’मध्ये पाली येतात का?” असा प्रश्न शाहरुखच्या चाहत्याने त्याला विचारला. याला उत्तर देताना किंग खान म्हणाला, “आमच्या घरात पाली तर दिसल्या नाहीत पण, फुलपाखरं खूप येतात. फुलांवर बसलेली ही सुंदर फुलपाखरं पाहायला माझ्या मुलांना खूप आवडतं.”

हेही वाचा : राघव-परिणीतीच्या लग्नात पाहुण्यांसाठी कडक नियमावली, पाळाव्या लागणार ‘या’ अटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने जगभरात जवळपास ९५० कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.