बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. २४ सप्टेंबरला राजस्थानमधील उदयपूर येथे परिणीती आणि राघव यांच्या शाही लग्न सोहळा संपन्न होणार आहे. त्यांच्या लग्न सोहळ्याची सध्या खूप चर्चा आहे. अशातच या लग्नाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.

परिणीती आणि राघव यांच्या लग्नाबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. कालच दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी उदयपूरला रवाना झाली. तर याचबरोबर आजपासून त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही लग्न स्थळी दाखल होणार आहेत. तर लग्नाला येणाऱ्या सर्वांसाठी चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीयांनी विशेष नियम आणि अटी आखल्या आहेत.

आणखी वाचा : लीला पॅलेसमध्ये परिणीती-राघवसाठी बुक करण्यात आला आलिशान महाराजा सुट, एका रात्रीचं भाडं तब्बल…

या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांनी त्यांचे मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यांना फोन घरी किंवा जिथे राहण्याची व्यवस्था केली असेल तिथे ठेवून लग्न सोहळ्यात सहभागी व्हावं लागणार आहे. याबरोबरच मोबाईलमधून लग्नाचे फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग करणे यावर पूर्णपणे बंदी घातली गेली आहे. या नियमांचं पालन होत आहे की नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवलं जाणार आहे.

हेही वाचा : उत्सवमूर्ती परिणीती, पण थाट प्रियांकाचा! बहिणीच्या साखरपुड्यात देसी गर्लने नेसलेल्या साडीची किंमत तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त राघव-परिणीतीचं नाही तर याआधी विकी-कतरिना, सिद्धार्थ-कियारा, अथिया शेट्टी-के.एल राहुल यांच्या लग्नात देखील पाहुण्यांना फोन वापरण्याची बंदी घालण्यात आली होती.