अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज अथिया व राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर थोड्याच वेळात हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

आणखी वाचा – Athiya Shetty-KL Rahul Wedding : पाहुणेमंडळींना ताटामध्ये नव्हे तर केळीच्या पानात वाढणार जेवण, लग्नात कोणत्या प्रकारचे पदार्थ असणार?

दरम्यान अथिया व राहुलच्या लग्नाच्या पहिल्या फोटोची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अथिया व राहुलने लग्नासाठी खास ड्रेस डिझाइन केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांचा लग्नाचा ड्रेस लाल रंगाचा नव्हे तर पांढरा व सोनेरी रंगाचा आहे. शिवाय त्यांच्या वेडिंग ड्रेसची किंमतही लाखो रुपयांच्या घरात आहे. सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने अथिया व राहुलच्या लग्नाचा ड्रेस डिझाइन केला आहे.

अथिया व राहुलच्या लग्नाची चर्चा सुरू असताना एक नवी माहिती समोर आली आहे. अथिया व राहुल हनिमूनला कुठे जाणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. पण लग्नानंतरही दोघांनी हनिमूनला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ईटाइम्स’च्या वृत्तानुसार, कामामुळे अथिया व राहुल हनिमूनला जाणार नाहीत.

आणखी वाचा – Photos : सुनील शेट्टीने लेकीच्या लग्नासाठी असं सजवलं खंडाळा येथील फार्म हाऊस, फोटोंमध्ये दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच त्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. तर अथिया तिचा नवा व्यवसाय सुरु करणार आहे. मध्यंतरी दोघंही युरोपला हनिमून प्लॅन करत असल्याचं बोललं जात आहे. अथिया व राहुल खरंच हनिमूनला जाणार की नाही? हे काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.