अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल यांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज अथिया व राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत. या शाही विवाहसोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या दोघांच्या संगीत सोहळ्याचेही बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अथिया-राहुलचा वेडिंग ड्रेस कसा असणार?

अथिया व राहुलने लग्नासाठी खास ड्रेस डिझाइन केला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांचा लग्नाचा ड्रेस लाल रंगाचा नव्हे तर पांढरा व सोनेरी रंगाचा आहे. शिवाय त्यांच्या वेडिंग ड्रेसची किंमतही लाखो रुपयांच्या घरात आहे. सुप्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने अथिया व राहुलच्या लग्नाचा ड्रेस डिझाइन केला आहे.

लग्नामध्ये जेवण काय असणार?

अथिया व राहुलच्य लग्नामध्ये कोणत्या पद्धतीचं जेवण असणार हेदेखील समोर आलं आहे. दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण लग्नामध्ये असणार आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांना कोणत्याही प्लेटमध्ये जेवण वाढण्यात येणार नाही. केळीच्या पाणांमध्ये पाहुणे मंडळींना जेवण देण्यात येणार आहे.

आणखी वाचा – Video: Athiya Shetty-KL Rahul च्या संगीत सोहळ्यात शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकले पाहुणे, पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज ४ वाजता अथिया व राहुलचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडेल. या शाही विवाहसोहळ्याला दोघांचेही कुटुंबीय, मित्र-मंडळी उपस्थित असतील. जवळपास १०० लोकांमध्येच हा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे. शिवाय लग्नानंतर ग्रँड रिसेप्शनचंही आयोजन करण्यात येणार आहे. या रिसेप्शनसोहळ्या बॉलिवडूसह क्रिकेट क्षेत्रातील मंडळीही उपस्थित असतील.