कार्तिक आर्यन हे नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यन हा एक आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तसंच त्याच्या खात्यात अनेक आगामी चित्रपट आहेत. कालच कार्तिकने त्याचा ३२ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना त्याने एक खास सरप्राईज दिलं.

कार्तिक आर्यनच्या वाढदिवशी त्याच्या आगामी ‘शेहजादा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात कार्तिक जबरदस्त अॅक्शनमध्ये दिसत आहे. कार्तिक आर्यनचा हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा :

काही चाहत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर अनेक चाहत्यांना चित्रपटातील कार्तिकचे अॅक्शन सीन्स अजिबात आवडले नाही. कार्तिक आर्यनच्या ट्विटरवर अनेक चाहते कार्तिकचा हा अंदाज आवडत नसल्याचं सांगत आहेत. कार्तिक आर्यनची तुलना अल्लू अर्जुनशी केली गेल्याबद्दल त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. एवढेच नाही तर चाहत्यांनी या चित्रपटाला साऊथची कॉपी म्हणत टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित धवन दिग्दर्शित, हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या २०२० मध्ये आलेल्या ‘अला वैकुंठपुररामुलू’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. शहजादाचा टीझर रिलीज झाल्यापासून कार्तिकचा हा चित्रपट चर्चेत आला आहे. शहजादा चित्रपटाच्या टीझरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. टीझरमध्ये कार्तिक आर्यन जोरदार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. कार्तिकचे अनेक अॅक्शन सीन अल्लू अर्जुनसारखे दिसत आहेत. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीही या चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.