विवेक रंजन अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. गेले अनेक महिने विवेक अग्निहोत्री या चित्रपटावर काम आहे होते. तर आता अखेर या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनीही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली करोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. आतापर्यंत काही प्रेक्षकांनी आणि काही कलाकारांनी परदेशात हा चित्रपट पाहिला आणि या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. तर आता या चित्रपटाचा ट्रेलर पाहून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातले उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

आणखी वाचा : “या चित्रपटाची गोष्ट…”, गिरीजा ओकने उघड केलं ‘द व्हॅक्सिन वॉर’बद्दलचं मोठं गुपित, म्हणाली…

या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये जगातली पहिली करोना प्रतिबंधक लस तयार करण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. याचबरोबर लस तयार करताना आलेल्या अडचणी, आजूबाजूंनी मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया, तज्ञांवर आलेला मानसिक दबाव या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक चांगलेच भारावले आहेत.

हेही वाचा : विवेक अग्निहोत्रींच्या बहुप्रतीक्षित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री, व्हिडीओ पोस्ट करत समोर आणला चेहरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता सोशल मीडियावरून हा ट्रेलर पाहून प्रेक्षक विविध प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “हा ट्रेलर पाहून खरोखरच अंगावर काटा आला.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “भारतीय चित्रपटसृष्टीत खरोखरच अशा प्रकारच्या कथेची खूप गरज आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “जबरदस्त ट्रेलर… चित्रपटासाठी खूप शुभेच्छा!” तर आणखी एक जण महणाला, “हा ट्रेलर पाहिला आणि खूप आवडला. माझ्या डोळ्यात खरोखर पाणी आलं. आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांना सलाम.” त्यामुळे आता या चित्रपटाला देखील तितकाच चांगला प्रतिसाद मिळणार असं दिसत आहे.