स्टार क्रिकेटर विराट कोहली नेहमी कुठल्या नं कुठल्या कारणाने चर्चेत असतो. कधी क्रिकेटमधील त्याच्या खेळामुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. विराट कोहली हा अनेकांचा आवडता क्रिकेटर आहे, त्यामुळे विराटचा चाहतावर्गही बराच मोठा आहे, म्हणून विराटबद्दलच्या कुठल्याही बातमीची मोठ्या प्रमाणात चर्चा होत असते. अशातच आता सध्या सोशल मीडियावर एका गोष्टीची बरीच चर्चा झाली. विराटने इन्स्टाग्रामवर अवनीत कौरच्या फॅन पेजने शेअर केलेला तिचा एक फोटो लाईक केल्याने या चर्चेला उधाण आलं.

१ मे रोजी विराटने त्याची बायको अभिनेत्री अनुष्का शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्याने इन्स्टा फिड क्लीअर करताना चुकून अवनीत कौरचा फोटो लाईक केला. परंतु, यानंतर सोशल मीडियावर मात्र सर्वत्र याचीच चर्चा होताना दिसली. यानंतर विराटने त्याच्या इन्स्टा स्टोरीमधून याबाबत भाष्य करत ही पोस्ट चुकून लाईक झाली असून यामागे कुठलाही उद्देश नसल्याचं म्हटलं होतं.

परंतु, विराट ही स्टोरी पोस्ट करेपर्यंत सोशल मीडियावर याबद्दलचे अनेक मीमस् व रील व्हायरल झाले होते. महत्त्वाचं म्हणजे विराटने अवनीत कौरच्या फॅन पेजने शेअर केलेला फोटो लाईक केल्यानंतर तिच्या फॉलोअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळलं; तर यामुळे सलग ४८ तास अवनीत स्पॉटलाईटमध्ये होती. अशातच आता विराटने अवनीतचा फोटो चुकून लाईक केल्याचा तिला मात्र फायदा झाल्याचं पाहायला मिळतं.

काही वृत्तांनुसार विराटच्या एका लाईकमुळे अवनीतच्या फॉलोअर्समध्ये तर वाढ झालीच, परंतु यामुळे तिला ब्युटी, फॅशनसंबंधित १२ नवीन जाहिराती मिळाल्या, तर पूर्वी अवनीतचे इन्स्टाग्रामवर ३० मिलियन इतके फॉलोअर्स होते, ज्यांच्यामध्ये आता वाढ झाली असून हा आकडा ३१.८ मिलियन इतका झाला आहे. त्यामुळे अवनीतच्या फॉलोअर्स लिस्टमध्ये अवघ्या काही दिवसांतच जवळपास १८ लाख फॉलोअर्सची वाढ झाली. काही दिवसांपूर्वी अवनीत व क्रिकेटर शुभमन गील यांचंही नाव जोडलं गेलं होतं. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अवनीतने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे; तर अभिनयासह अवनीतला नृत्याचीही तितकीच आवड आहे. तर लवकरच ती ‘लव्ह इन व्हिएतनाम’ या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळणार आहे.