‘परफेक्ट’, ‘शेप ऑफ य़ू’ गाण्यांचा सुप्रसिद्ध गायक Ed Sheeran म्हणजेच एडवर्ड क्रिस्टोफर शीरन सध्या भारतात आला आहे. यामागचं कारण म्हणजे लवकरच Ed Sheeranचा मुंबईमध्ये कॉन्सर्ट होणार आहे. याआधी मुंबईतील एका शाळेला भेट देऊन त्याने विद्यार्थ्यांसमोर त्याच्या हिट गाण्यांवर परफॉर्मही केलं. यानंतर त्याने बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचीही भेट घेतली

आयुष्मान खुरानाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर Ed Sheeranबरोबर एक फोटो शेअर केला आहे. यात आयुष्मानने काळ्या रंगाची बॅगी हूडी घातली आहे, तर Ed Sheeran सफेद रंगाच्या टी-शर्टवर दिसतोय. या फोटोला कॅप्शन देत आयुष्मानने लिहिले, “Ed Sheeranबरोबरच्या माझ्या पोलेरॉइड आठवणी, Ed Sheeran तुला भेटून खूप आनंद झाला.”

pope francis news today
“देवावर हसणं म्हणजे निंदा नाही, पण विनोद…” पोप फ्रान्सिस विनोदी कलाकारांना काय म्हणाले?
Lok Sabha Election 2024 Baramati Supriya Sule Lead congratulations Banners At New York Times Square
VIDEO: अमेरिकेतही सप्रिया सुळेंच्या लोकप्रियतेचा डंका; टाईम्स स्क्वेअरवर झळकला बाप-लेकीचा फोटो
The return of Intel DRAM chip manufacturing Decision to stop production
चिप-चरित्र: इंटेलचं पुनरागमन
Brad Pitt daughter files to drop Pitt from her name
बाबाचं आडनाव हटवण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची कोर्टात धाव, १८ वर्षांची होताच घेतला मोठा निर्णय
Kirti Vyas, murder,
कीर्ती व्यास हत्या प्रकरण : सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानीला जन्मठेप
Chhaya Kadam Nagraj manjule friendship
“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य
watermelon in cannes
Watermelon at Cannes: हमास-इस्रायल युद्धादरम्यान कलिंगड कसे ठरले पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक?
kutuhal buks
कुतूहल: रॉडनी अॅलन ब्रुक्स

Ed Sheeran नंतर एका पार्टीत गेला होता. तिथे तो प्रसिद्ध गायक अरमान मलिकलासुद्धा भेटला. या पार्टीत दोघांनी अरमानच्या ‘बुट्टा बोम्मा’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. यात अरमान Ed Sheeranला ‘बुट्टा बोम्मा’च्या हूक स्टेप शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील झाला. याला अरमानने कॅप्शन देतं लिहिले, “माझा आवडता व्यक्ती माझ्या आवडत्या शहरात आला आहे.”

दरम्यान, Ed Sheeran आशिया आणि युरोप टूर २०२४ चा भाग म्हणून भारतात परफॉर्म करणार आहे. त्याचा परफॉर्मन्स १६ मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे. भारतातील Ed Sheeranचा हा दुसरा कॉन्सर्ट असेल. २०१७ मध्ये भारतात त्याने पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं.