बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे अभिनेत्याचे नेटकऱ्यांना गोंधळात टाकलं आहे.

आयुष्मान खुराना व्हायरल व्हिडीओ

आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत आयुष्यमान लाल रंगाचा गाऊन घालून त्याच्या वॅनिटीमधून बाहेर पडताना दिसतोय. बाहेर पडताचक्षणी त्याचं अपहरण होतंय असं या व्हिडीओद्वारे कळतंय. आयुष्मान त्याच्या फोनवर बोलत असतानाच एक लाल रंगाची वॅन आयुष्मानच्या समोर येऊन थांबते आणि ३ ४ गुंड त्या वॅनमधून उतरतात आणि आयुष्माचं अपहरण करतात. एक माणूस तर चक्क अभिनेत्याला चाकूचा धाक दाखवताना दिसतोय. आयुष्मानही गपगुमान गाडीत बसतो आणि ती गाडी निघून जाते. हे सगळं अगदी काही मिनिटातंच घडताना दाखवलंय.

हेही वाचा… कलरफुल पूजा सावंतला पडली ‘गुलाबी साडी’ या गाण्याची भुरळ, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

आयुष्मानचं अपहरण होत असताना आजूबाजूला काही माणसं त्याचं शूटिंग करताना दिसतायत. त्यामुळे हे खरं आहे की कसलं शूटिंग आहे. किंवा काही पब्लिसीटी स्टंट आहे हे लवकरच कळेल.

हेही वाचा… “अंगारो सा…” ‘पुष्पा २’ मधील गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू, पूर्वा आणि प्रसादचा हटके डान्स, कलाकारांच्या हूकस्टेपने वेधलं लक्ष

आयुष्मानच्या अपहरणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल होताच या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हे सगळं स्क्रिप्टेड आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे त्याच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चालू आहे.” एका युजरने म्हटलं, “ज्याचं अपहरण होतंय तो खूपच उत्साही दिसतोय.” “आजकालची लोकं खूप शहाणी झालीयत सर, तुमच्या अशा अभिनयाने फसणार नाहीत” असंही एकजण म्हणाला.

हेही वाचा… २६ वर्षांपूर्वीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर थिरकली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब; डान्सर रुपेश बनेने दिली साथ, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयुष्मान खुरानाच्या कामाबाबत सांगायचं झालं तर, ‘ड्रीम गर्ल-२’ या चित्रपटात तो शेवटचा झळकला होता. त्याच्या आगामी चित्रपटांची अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. आयुष्मानचे करिअर सध्या डगमगताना दिसतंय. अभिनेता आता एका सुपरहिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहेत. पण या व्हायरल व्हिडीओवरून असा अंदाज येत आहे की अभिनेता लवकरच काहीतरी धमाकेदार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.