बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाने त्याच्या दमदार अभिनयामुळे अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ‘विकी डोनर’ चित्रपटातून पदार्पण करीत आयुष्मानने करिअरला सुरुवात केली होती. एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानामुळे सध्या आयुष्मान चर्चेत आला आहे. रणबीर कपूरने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवल्यावर आयुष्मान कसा घाबरला होता याचा खुलासा त्याने एका कार्यक्रमादरम्यान केला.

रणबीर कपूरनंतर, रणवीर सिंगने २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या रोमँटिक कॉमेडी ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटामधून पदार्पण केले. यानंतर अनेकदा आता मी या इंडस्ट्रीमध्ये काय करू? असा विचार मनात आल्याचे आयुष्मानने सांगितले. आयुष्मान पुढे म्हणाला, “मी टीव्ही अँकर होतो तेव्हा चित्रपट निर्माते शुजित सरकार ‘विकी डोनर’ चित्रपट करीत होते. त्यांना ‘विकी डोनर’मधील भूमिकेला मी न्याय देऊ शकेन, असा विश्वास होता. त्यानंतर मी या चित्रपटासाठी ऑडिशन दिली आणि बॉलीवूडमधील माझा प्रवास सुरू झाला.”

हेही वाचा : “शाहरुख-सलमानच्या चित्रपटांमधून नकारात्मक…” ‘शार्क टँक इंडिया फेम’ परीक्षकाचे बॉलीवूडबद्दल परखड मत!

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटांच्या निवडीविषयी बोलताना आयुष्मानने सांगितले, “एखाद्या चित्रपटाची निवड करताना मी केवळ स्वत:च्या व्यक्तिरेखेचा अभ्यास न करता संपूर्ण कथेचा अभ्यास करतो. चित्रपटात माझी प्रमुख व्यक्तिरेखा असली तरीही नायकाच्या सभोवतालची इतर पात्रेसुद्धा खूप प्रभावशाली वाटली पाहिजेत. याचे उदाहरण द्यायचे झाले तर ‘अ‍ॅक्शन’मधील जयदीप अहलावत असो किंवा ‘बरेली की बर्फी’मधील राजकुमार राव यांच्यासह ‘बधाई हो’ चित्रपटात नीना गुप्ता आणि ‘दम लगा के हैशा’मध्ये भूमी पेडणेकरचे पात्रही प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडून जाते.”

हेही वाचा : “लोकांना ठरवू द्या…” ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी!

आयुष्मान खुराना लवकरच ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामार्फत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये त्याची सहकलाकार अनन्या पांडे असेल.