Bajrangi Bhaijaan completes 10 Years: काही चित्रपट प्रदर्शित होऊन कितीही काळ उलटला तरी त्यांची लोकप्रियता कमी होत नाही. चित्रपटाचे कथानक, कलाकारांचे अभिनय, गाणी यामुळे एखादा चित्रपट बराच काळ प्रेक्षकांच्या लक्षात राहतो.

अशाच काही चित्रपटांमध्ये बजरंगी भाईजानचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सलमान खान व करिना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजला होता.

बजरंगी भाईजानला १० वर्षे पूर्ण

भारत-पाकिस्तान बॉर्डर पार करून एक लहान मुलगी भारतात येते. विशेष म्हणजे या मुलीला बोलता येत नाही. ती हनुमानाची भक्त असलेल्या पवनला भेटते. त्याला समजते की ती भारतातील नसून पाकिस्तानमधील आहे. तिला तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा तो निर्णय घेतो. तिला तो मुन्नी या नावाने हाक मारतो. त्यासाठी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पण, सगळे अडथळे पार करत बजरंगी भाईजान त्या मुलीला तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवतो. या संपूर्ण प्रवासात बजरंगी भाईजान व मुन्नीचे बॉण्डिंग पाहायला मिळते. त्यांचा भावनिक प्रवास, छोट्या-मोठ्या गमतीजमती प्रेक्षकांना भावतात.

या चित्रपटाचे शूटिंग विविध ठिकाणी केले होते. आता बजरंगी भाईजानला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दिग्दर्शक कबीर बेदींनी सोशल मीडियावर शूटिंगदरम्यानचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान खान, कबीर खान, हर्षाली मल्होत्रा, करीना कपूर खान, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकार दिसत आहेत.

हे फोटो शेअर करताना कबीर खानने लिहिले, “हॅपी बजरंगी डे! बजरंगी भाईजानने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले, त्याला दहा वर्षे झाली यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जगभरातून गेल्या दहा वर्षांत या चित्रपटाला ज्याप्रकारे प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे, ते पाहून मी भारावून गेलो आहे. अनेकदा लोकांना भावनांचा विसर पडतो, अशा जगात आम्ही प्रेम आणि आशेची गोष्ट सांगितली. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या मनात काय भावना होत्या, हे सांगणारे लोक मला आजही भेटतात. माझ्यासाठी हेच खरे बक्षीस आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बजरंगी भाईजान हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता कबीर खानने शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग आणण्याची विनंती केली आहे.