Bhoot To Pari Watch Scariest Bollywood Horror Movies : हॉरर चित्रपटांचा एक वेगळा चाहतावर्ग असतो. गूढ, रहस्यमय आणि हॉरर कथानक असलेले चित्रपट प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पहात असतात. आता ओटीटीच्या काळात तर कुठल्याही भाषेतील, देशातील हॉरर चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या फोनमार्फतही पाहता येतात. बॉलीवूडमध्येही असेच काही हॉरर चित्रपट आहेत. कोणते आहेत ते चित्रपट जाणून घ्या…

राज – बॉलीवूडमधील हॉरर चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर यातील एक म्हणजे ‘राज’ हा चित्रपट. विक्रम भट्ट यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. अभिनेत्री बिपाशा बासू आणि दिनो मोरिया यामध्ये झळकले होते. या चित्रपटात एक नवरा बायकोची जोडी उटी येथे सुखात रहात असतात, पण त्यांना अचानक काही आवाज येऊ लागतात आणि भास होतात, ज्यानंतर कथानकात ट्विस्ट येतो. ‘राज’ चित्रपटात रहस्य, गूढ आणि थ्रिलर पाहायला मिळतो.

भूत – राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘भूत’ हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये अजय देवगण, उर्मिला मातोंडकर, फरदीन खान, संजय ठक्कर, रेखा आणि नाना पाटेकर असे बॉलीवूडमधील लोकप्रिय कलाकार पाहायला मिळतात. या चित्रपटात एका दांपत्याला त्यांच्या नवीन घरात एक भूतनी त्रास देत असते असं पाहायला मिळतं. तर या चित्रपटाची एकूनच कथा खूप रंजक आहे.

कृष्णा कॉटेज – ‘कृष्णा कॉटेज’ हा चित्रपट मित्रांच्या गोष्टीवर आधारित आहे. हे मित्र एक पुस्तक वाचतात आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यात विचित्र आणि भीषण घटना घडू लागतात. त्यांच्यात दिशा नावाची एक मुलगी येते आणि मग एकामागोमाग एक मृत्यू होऊ लागतात. सोहेल खान, ईशा कोप्पीकर आणि अनिता हसनंदानी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट २००० च्या दशकातील गाजलेल्या हॉरर चित्रपटांपैकी एक आहे.

परी – बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. यात तिने रुकसाना ही भूमिका साकारली आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या परी चित्रपटाचं दिग्दर्शन प्रोसीत रायने केलं आहे.

Makdee – २००२ साली आलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाजने केलं आहे. या चित्रपटात रहस्य, विनोद यांचं अचूक समीकरण आहे. यामध्ये शबाना आझमी यांची लक्षवेधी भूमिका असल्याचं पाहायला मिळतं.