‘बिग बॉस १६’ शोच्या पहिल्या आठवड्यापासून स्पर्धक शालीन भानोत चर्चेत राहिला आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये त्याचं स्पर्धक टीना दत्ताशी असलेलं नातं आता जगजाहिर झालं आहे. शालीन-टीना एकमेकांच्या प्रेमात असल्याचं गेले काही दिवस चित्र पाहायला मिळत आहे. आता या दोघांबाबत एक वेगळीच गोष्ट समोर आली आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये शालीन-टीनामध्ये जवळीक वाढली आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरामध्ये याआधी सौंदर्य शर्मा व गौतम विग एकत्रित बाथरुममध्ये जाताना दिसले होते. आता शालीन-टीनानेही तेच केलं आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये शालीन-टीना मध्यरात्री बाथरुममध्ये जाताना दिसले. त्यांचं हे वागणं पाहून घरातील इतर सदस्य दोघांवरही टीका करू लागतात.

घरातील सदस्य अर्चना, सौंदर्य व गौतम शालीन-टीनाबाबत बोलू लागतात. बराच वेळ दोघं बाहेर आलेच नाहीत हे पाहून अर्चना म्हणते, “आता ‘बिग बॉस’ला हे दिसत नाही का? दोघंही बाथरुममध्ये आहेत. पूर्ण ‘बिग बॉस’चीच यांनी बदनामी केली आहे. हे पाहिल्यानंतर ‘बिग बॉस’ बाथरुममध्येच सुरु आहे असं लोक म्हणतील.”

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “आता जर मी यांना म्हटलं तुमचं बाथरुममध्ये काय सुर आहे? तर आम्ही फक्त चांगले मित्र-मैत्रिणी आहोत असं उत्तर देतील. मुलगा-मुलगी बाथरुमध्ये तेही एकत्र.” दोघं आतमध्ये काय करत असतील हे इशाराने इतर सदस्यांना सांगत अर्चना शालीन-टीनाची मस्करी करते. पण सध्या शालीन-टीनाचं नातं सोशल मीडियावरही चर्चेत आलं आहे.