सलमान खानच्या घरावर गेल्या महिन्यात गोळीबार झाला होता. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई समाज सलमान खानवर नाराज आहे. या प्रकरणी सलमानला माफ करावं, असं त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली म्हणाली होती. तिच्या या विधानानंतर आता अखिल भारतीय बिश्नोई सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी सोमवारी मोठी घोषणा केली आहे. १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खानने माफी मागितल्यास त्याला माफ करण्याचा विचार करू, असं त्यांनी म्हटलं आहे.

“तो माझ्यापेक्षा जास्त यशस्वी असला तरी…”, अनिल कपूरबद्दल भाऊ संजयचं विधान; म्हणाला, “अर्जुन, सोनम किंवा जान्हवी…”

सोमी अलीने मागितली होती माफी

मागच्या आठवड्यात सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिश्नोई समुदायाची माफी मागितली होती. सलमान खानला बिश्नोई गँगकडून बऱ्याचदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या महिन्यात १४ एप्रिलला अभिनेत्याच्या घरावर गोळीबार झाला होता आणि त्याची जबाबदारी लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमीने बिश्नोई समुदायाकडे सलमानला माफ करण्याची विनंती केली होती. “त्याच्याकडून चूक झाली असेल तर मी त्याच्या वतीने माफी मागते, प्लीज त्याला माफ करा. कोणाचा जीव घेणं मान्य नाहीच, मग तो सलमान असो वा कोणी सामान्य माणूस,” असं सोमी म्हणाली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने हे वृत्त दिलं आहे.

“होय, त्याने प्रीती झिंटाला डेट केलं होतं,” प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबाबत खुलासा; म्हणाली, “मी त्या दोघांच्या…”

देवेंद्र बुडिया काय म्हणाले?

सोमीच्या या वक्तव्यावर देवेंद्र बुडिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सलमानने स्वतः माफी मागितल्यास बिश्नोई समाज माफीचा विचार करेल. कारण ती चूक सोमी अलीने केली नव्हती, तर सलमानने केली होती. त्यामुळे त्याने माफीचा प्रस्ताव बिश्नोई समाजापुढे ठेवायला हवा. त्याने मंदिरात येऊन माफी मागावी आणि भविष्यात कधीच अशी चूक करणार नाही, तसेच वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी काम करणार, अशी शपथ त्याने घेतली पाहिजे. सलमानने असं केल्यास समाजातील लोक एकत्र येऊन त्याला माफ करण्यासंदर्भात निर्णय घेतील,” असं देवेंद्र बुडिया म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

सूरज बडजात्या यांच्या ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सप्टेंबर १९९८ मध्ये जोधपूरजवळील मथानिया येथील बावडमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर होता. याप्रकरणी तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमानला या प्रकरणात पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती.