अभिनेता सनी देओल व अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या ‘गदर २’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि त्यामधील संवादाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये भाजपा खासदावर व अभिनेता सनी देओलने भारत-पाकिस्तानदरम्यानच्या संबंधांवरही प्रतिक्रिया दिली.

Gadar 2 Trailer : “…तर अर्ध्याहून जास्त पाकिस्तान खाली होईल”, ‘गदर २’ चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, सनी देओलच्या जबरदस्त ॲक्शनने वेधले लक्ष

सनी देओल म्हणाला, “भारत-पाकिस्तान दोन्ही देशांंमध्ये शांतताप्रिय लोक आहेत. राजकीय दोषारोपांच्या खेळामुळे दोन्ही देशात द्वेष निर्माण होतो. खरं तर दोन्ही देशातील जनतेला भांडण नको आहे. कारण शेवटी सगळे एकाच मातीतले आहेत. याच सर्व गोष्टी तुम्हाला यावेळी गदर २ मध्येही पाहायला मिळतील. काहीही देण्याचा-घेण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हा प्रश्न मानवतेचा आहे.”

“मी आणि काजोलने किसिंग सीन केला तेव्हा अजय देवगण…”, ‘द : ट्रायल’ फेम अभिनेत्याचा खुलासा

‘गदर २’ च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते बघता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी अक्षय कुमारच्या ओह माय गॉडचा सिक्वेल ओएमजी २ प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘गदर’प्रमाणेच ‘गदर २’ चित्रपटाची थीम भारत-पाकिस्तानवर आधारित आहे. ‘गदर २’ च्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास या चित्रपटात सनी देओल त्याचा मुलगा जीतसाठी पाकिस्तानशी लढताना दिसणार आहे. पहिल्या ‘गदर’मध्ये दोन देशांतील फाळणीच्या वेदना आणि द्वेष पाहायला मिळाला होता. यावेळी तारा सिंग, सकिना आणि त्यांचा मुलगा जीत यांची कथा पाहायला मिळणार आहे.