बॉलीवूडमधील स्टारकिड्स नेहमी चर्चेत असतात. या स्टारकिड्सचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. बऱ्याच स्टारकिड्सने झगमगत्या दुनियेत पदार्पण केलं आहे. असे काही स्टारकिड्स आहेत, ज्यांनी दुसरा मार्ग निवडला आहे. पण, हे स्टारकिड्स खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक म्हणजे अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचा मुलगा आरव कुमार.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची दोन्ही मुलं माध्यमापासून दूर असतात. पण, आरव जिथे जातो, तिथे तो पापराझींच्या कॅमेरात कैद होतोच. सध्या आरवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आरव एका मिस्ट्री गर्लसह पाहायला मिळत आहे.

नुकताच आरव कुमार हुमा कुरैशीच्या ईद पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी आरवच्या लूकने सगळ्यांची मनं जिंकली. त्याने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. यामध्ये आरव खूपच सुंदर दिसत होता. यावेळी आरवबरोबर दिसणाऱ्या मिस्ट्री गर्लने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आरव ज्या गाडीतून प्रवास करत होता, त्याच गाडीत त्याच्या बाजूला मिस्ट्री गर्ल पाहायला मिलाली. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ही मिस्ट्री गर्ल खूपचं सुंदर दिसत होती. आरव आणि त्याच्या मिस्ट्री गर्लचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. या मिस्ट्री गर्लबाबत जाणून घेण्यासाठी नेटकरी खूपच उत्सुक आहेत.

अक्षय कुमारला आहे लेकाचं खूप कौतुक

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने अभिमानने सांगितलं होतं की, आरवला चित्रपटांहून जास्त फॅशन डिझाइन खूप आवडतं. मी आणि ट्विंकलने आरवचं ज्याप्रमाणे पालन-पोषण केलं. त्यासाठी मी खूप आनंदी आहे. तो खूप साधा मुलगा आहे. आम्ही कधीच त्याला कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही. त्याला फॅशन डिझाइनमध्ये खूप रस आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अक्षय कुमार म्हणाला होता, आरव स्वतःचे कपडे स्वतः धुतो. तो खूप छान जेवण बनवतो. भांडी घासतो. त्याला महागडे कपडे खरेदी करायला आवडत नाही.