योगी आदित्यनाथ हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच योगी आदित्यनाथे हे मनोरंजन क्षेत्रातही रुचि घेत असतात.

सध्या उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटनगरी उभारायचं काम योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली जोमाने सुरू आहे. मध्यंतरी योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन चित्रपटसृष्टीतील कलाकारांची भेटसुद्धा घेतली. कलाकारांबरोबर योगी आदित्यनाथ यांचे चांगले संबंध आहेत. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्याने नुकतीच योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.

आणखी वाचा : ‘सॅम बहादुर’साठी विकीने घेतले सहा शीख रेजिमेंटकडून प्रशिक्षण; ‘उरी’दरम्यानची अभिनेत्याने शेअर केली आठवण

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र हे सध्या लखनऊमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले आहेत. यानिमित्त त्यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची त्यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. योगी आदित्यनाथ यांना भेटल्यावर धर्मेंद्र चांगलेच खुश दिसत होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये बऱ्याच गप्पा व काही विषयांवर चर्चाही झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भेटीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धर्मेंद्र यांना एक स्मृतिचिन्ह भेट म्हणून दिलं. सध्या या भेटीचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धर्मेद्र नुकतेच करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकले. या चित्रपटात त्यांचा आणि शबाना आजमी यांच्यातील लिपलॉक सीनचीही जबरदस्त चर्चा रंगली होती.