scorecardresearch

दिशा सालियन प्रकरणाच्या एसआयटी चौकशीवर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, “देवेंद्र फडणवीसांनी…”

दिशा सालियनची हत्या झाली नसून ती आत्महत्या आहे अशा निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहचले आहेत.

दिशा सालियन प्रकरणाच्या एसआयटी चौकशीवर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, “देवेंद्र फडणवीसांनी…”
दिशा सालियन मृत्यूची एसआयटी चौकशी

Disha Salian Case :

नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशन कोणतेही असो ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहते. यंदाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही यावरून आरोप- प्रत्यारोप झाले. या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होईल असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. या घटनेवरच आता प्रसिद्ध अभिनेता केआरकेने भाष्य केलं आहे.

सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान सातत्याने चर्चेत येत असतो. त्याने आपल्या ट्वीटवर अकाऊंटवर पोस्ट लिहली आहे. तो असं म्हणाला की “दिशा सालियनच्या केसची पुन्हा एकदा एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक उत्तम आदेश दिला. प्रत्येकाला पूर्ण न्याय मिळाला पाहिजे.” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“मला त्याला भेटायचं होतं, पण त्याची जवळची व्यक्ती…”; सुशांत सिंह राजपूतच्या सहकलाकाराचा मोठा गौप्यस्फोट

दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी या प्रकारांची चौकशी केली मात्र दिशा सालियनची हत्या झाली नसून ती आत्महत्या आहे अशा निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले आहेत.

दिशा सालियनच प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्याने या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल त्यातून काय बाहेर येणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 19:03 IST

संबंधित बातम्या