बॉलीवूड अभिनेत्री श्वेता रोहिरा हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता पुलकित सम्राटची पहिली पत्नी व अभिनेत्री श्वेता रोहिरा हिचा भीषण अपघात झाला आहे. श्वेताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती हॉस्पिटलमधील बेडवर दिसत आहे. त्याच्या ओठांवर पट्टी आहे आणि तिच्या संपूर्ण पायावर प्लास्टर दिसत आहे. फोटोंमध्ये श्वेताची गंभीर स्थिती पाहून चाहत्यांना तिची काळजी वाटत आहे.

श्वेता रोहिराने स्वतः तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोन फोटो शेअर करत तिने तिच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगितला. “आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. तुम्ही ‘कल हो ना हो’ गुणगुणत असता, दिवसभर काय करायचे याचे नियोजन करत असता? पुढच्याच क्षणी आयुष्य या वाटेवर एक दुचाकी पाठवतं. माझी काहीच चूक नव्हती, तरीही चालता-चालता मी अचानक खाली पडले,” असं श्वेताने लिहिलं.

“जखमा, मोडलेली हाडं, किती तरी तास अंथरुणात पडून…या सगळ्याची मी कल्पनाही केली नव्हती. पण कदाचित युनिव्हर्सला वाटलं की मला संयमाचा धडा शिकवण्याची गरज आहे. मी हॉस्पिटलच्या नाटकात स्वतःच्या मिनी सोप ओपेरात अभिनय करावा अशी त्याची इच्छा होती. अनेक वेळा आयुष्य आपल्याला अशा प्रसंगांमधून मजबूत बनवते. मला माहीत आहे की हे फक्त एक चॅप्टर आहे, पूर्ण कहाणी नाही,” असं श्वेताने लिहिलं.

पाहा पोस्ट –

श्वेता पुढे चाहत्यांना म्हणाली की तिला दुखातही हसायला आवडतं. ही वेळही निघून जाईल असा तिला विश्वास आहे. चित्रपटांप्रमाणेच आयुष्यात चढ-उतार येत असतात. एखाद्याच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर स्वतःवर विश्वास ठेवावा, ती वेळ निघून जाईल, असं ती म्हणाली.

दरम्यान, श्वेताची प्रकृती पाहून चाहते काळजीत पडले आहेत. श्वेता लवकर बरी व्हावी, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वेताच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती प्रसिद्ध शॉर्ट फिल्म स्पॉटलेसमध्ये काम करून लोकप्रिय झाली. तसेच ती पुस्तकांचे प्रमोशन करते. ती अभिनेता पुलकित सम्राटची पहिली बायको आहे. तसेच सलमान खान तिला बहीण मानतो, ती सलमानला राखी बांधते.