बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. अनेकवर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या रितेशने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : विराट-अनुष्काच्या घरी गणेशोत्सवाची तयारी, अभिनेत्रीने शेअर केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

रितेश आणि जिनिलीयाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. २००३ चा ‘तुझे मेरी कसम’ ते २०२२ च्या अखेरिस प्रदर्शित झालेला ‘वेड’ या सगळ्या चित्रपटादरम्यानचे जिनिलीयाबरोबरचे रोमॅंटिक फोटो रितेशने एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत.

हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

‘तेरे नाल लव्ह हो गया’, ‘तुझे मेरी कसम’, ‘मिस्ट मम्मी’, ‘वेड’ अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. या सगळ्या जुन्या आठवणींचे रोमॅंटिक फोटो अभिनेत्याने एका व्हिडीओद्वारे शेअर केले आहेत. रितेशने या व्हिडीओला “उड दी फिरा…” हे गाणं लावलं असून याला, “आम्ही एकत्र असतो तेव्हा अधिक चांगले दिसतो” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “यंदा मला कोकणात जाता येणार नाही, कारण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील निखिल बनेने व्यक्त केली खंत, म्हणाला “माझ्या घरी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रितेश देशमुखने शेअर केलेल्या या व्हिडीओला अवघ्या १ तासात २ लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. नेटकऱ्यांनी रितेश-जिनिलीयाच्या व्हिडीओवर ‘मराठी जोडी’, ‘दादा – वहिनी महाराष्ट्राची शान’, ‘बॉलीवूडची सर्वात सुंदर जोडी’, ‘मराठमोळे रितेश-जिनिलीया’ अशा असंख्य कमेंट्स केल्या आहेत.