सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. अशातच ‘स्टाइल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ यांसारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता साहिल खानने पुन्हा लग्न केल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ४७व्या वर्षी साहिल दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याने पत्नीसहचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत; जे तुफान व्हायरल झाले आहेत.

अभिनेता साहिल खानने एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या २१ वर्षांच्या दुसऱ्या पत्नीची ओळख करून देताना दिसत आहे. “ही माझी सुंदर पत्नी,” असं साहिल सांगताना पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या या व्हिडीओवर चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. या व्हिडीओ व्यतिरिक्त साहिलने दुसऱ्या पत्नीसह अनेक सुंदर फोटो देखील शेअर केले आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मध्ये कोणी मारली बाजी? कोणाला मिळाले सर्वाधिक पुरस्कार? वाचा

याआधीने साहिलने २००३मध्ये निगार खानबरोबर लग्न केलं होतं. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. साहिल व निगारने २००५ साली घटस्फोट घेतला.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचा स्त्री वेशातील रेट्रो लूक व्हायरल, नेटकरी म्हणाले, “बाबो, लय खतरनाक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, साहिलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २००१मध्ये ‘स्टाइल’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्रॉस’, ‘अलादीन’ यांसारख्या चित्रपटात त्याने काम केलं. पण त्याला बॉलीवूडमध्ये फारस यश मिळालं नाही. सध्या साहिल एक व्यावसायिक आहे. त्याच्या अनेक जीम आहेत. याशिवाय साहिलची स्वतःची एक कंपनी आहे; जी फिटनेस सप्लीमेंट्स बनवण्याचे काम करते. आता साहिल अभिनय कमी आणि फिटनेस ट्रेनर म्हणून अधिक काम करतो.