बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमी काही ना काही कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. पठाण हा शाहरुखच्या करिअरमधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आपल्या अगामी चित्रपटाच्या शुटींगसाठी शाहरुख खान काश्मीरला गेला होता. श्रीनगरच्या विमानतळावरचा शाहरुख खानचा एक व्हिडीओ सध्यासोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा- “माझ्या आजूबाजूला इतक्या बंदूका बघून…”; जीवे मारण्याच्या धमक्या

नेमकं कसं जगतोय? सलमान खानने केला खुलासा

‘डंकी’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी शाहरुख कश्मीरला गेला होता. श्रीनगरच्या विमानतळावर शाहरुख खान याला पाहून लोकांनी मोठी गर्दी केलीये. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमानतळावर शाहरुख खान याला पाहून लोकांनी त्याच्या भोवती मोठी गर्दी केलीये. प्रत्येकजण हा शाहरुख खान याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. शाहरुख खान हा गर्दीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. सुरक्षारक्षक शाहरुख खान याला गर्दीमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, गर्दी सतत वाढताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर शाहरुखने जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी जवान चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याचा जवान चित्रपटाचा लूक देखील समोर आला होता. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी डंकी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शाहरुखचा डंकी चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.