बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. नुकताच बालदिन होऊन गेला तेव्हा बॉलिवूडपासून ते मराठी कलाकारांपर्यंत सगळ्यांनी आपल्या लहानपणीचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या चाहत्यांनीदेखील पसंती दर्शवली होती. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतल्या अभिनेत्याला त्याच्या चाहत्यांनी ओळखलं आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या एका अभिनेत्याची जोरदार चर्चा आहे. आपल्या अभिनयनाने आणि लुक्समुळे तो तरुणींच्या गळ्यातल्या ताईत बनला आहे. तो अभिनेता म्हणजे विकी कौशल. विकीचा लहानपणीचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत तो नाचताना दिसत आहे बहुदा तो शाळेतील स्नेहसंमेलनातील तो फोटो असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

“अनन्याला याची जाणीव…” लेकीच्या ‘लाइगर’ चित्रपटाच्या अपयशावर चंकी पांडेंनी केलं भाष्य

विकी सध्या चर्चेत आहे कारण त्याचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो कियारा अडवाणी , भूमी पेडणेकर या दोन अभिनेत्रींनबरोबर झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून यातील ‘बिजली’ हे गाणेदेखील समोर आले आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकी कौशल मूळचा मुंबईकर असून त्याचे वडील श्याम कौशल हे चित्रपटांमध्ये साहसी दृश्य दिग्दर्शित करतात. विकी पेशाने इंजिनीअर असून त्याने आपल्या कारकिर्दीची सुरवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे. मसान चित्रपटातून त्याने अभिनय करण्यास सुरवात केली. पुढे त्याने ‘राझी’, ‘उरी’, ‘सरदार उधम’ यांसारख्य चित्रपटात त्याने काम केले आहे. अभिनेत्री कतरिना कैफबरोबर त्याने लग्नगाठ बांधली आहे.