शाहरुख खानचे चाहते हे जगभरात आहे. अनेक कलाकार देखील शाहरुखचे चाहते आहेत. WWE स्टार व हॉलीवूड अभिनेता जॉन सीना बॉलीवूडच्या या बादशाहाचा मोठा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी जॉन सीनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये जॉन सीना शाहरुख खानचं गाणं गाताना पाहायला मिळाला. याच व्हिडीओवर आता शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जॉन सीना ‘दिल तो पागल है’ मधील ‘भोली सी सूरत’ हे गाणं गाताना दिसला होता. जॉनचा हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की, शाहरुखने देखील त्याचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा – “वेगळं आणि खास तुमच्यासाठी…”, ‘चला हवा येऊ द्या’मधून एक्झिट घेतल्यानंतर निलेश साबळेंचा प्लॅन बी समोर, म्हणाले…

एक्सवर शाहरुख खान जॉन सीनाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “तुमच्या दोघांचे आभारी आहे. प्रेम करा आणि जॉन सीना तुला खूप सारं प्रेम. मी तुम्हाला माझी नवीन गाणी पाठवतो आणि मला त्या गाण्यांवर तुमच्या दोघांचा डुएट पाहिजे.” शाहरुखची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी खूपच खास ठरलं. गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले, जे सुपरहिट ठरलं. ‘पठाण’, ‘जवान’ व ‘डंकी’. या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता लवकरच शाहरुख केजीएफ स्टार यशच्या ‘टॉक्सिक’ चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. मात्र अद्याप याची अधिकृत माहिती जाहीर केली नाही.