बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमी चर्चेत असते. विविध बॉलीवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं. मात्र, सध्या जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे जान्हवी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

जान्हवी कपूरचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ समोर आला आहे. जान्हवीने फ्लोरल ब्लू फ्रॉक ड्रेस परिधान केला होता. या वेळी तिच्या एका हातात पर्स आणि दुसऱ्या हातात पांढरी उशी होती. जान्हवीच्या हातात उशी बघून नेटकरी वेगवेगळे कमेंट करत आहेत.

व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी जान्हवीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, ‘हॉटेलमधून उशी चोरली का?’. तर दुसर्‍याने लिहिले, ‘विमानात जात आहे की ट्रेनमध्ये.’ एका युजरने लिहिले की, ‘असं दिसतं की बिचारी इतकी अस्वस्थ आहे, की आयुष्यातील सगळ्या समस्यांनी तिला ग्रासलं आहे.’ एका युजरने चांगली हॅण्ड बॅग वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा- …जेव्हा भर कार्यक्रमात कतरिना कैफ पडली होती मनोज बाजपेयींच्या पाया; म्हणाली, “तुम्ही खूप…”; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती ज्युनियर एनटीआरसोबत तिच्या साऊथ डेब्यू ‘देवारा’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय ती राजकुमार रावसोबत ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’मध्येही दिसणार आहे. त्याने अलीकडेच ‘उलझ’ या नव्या चित्रपटाची घोषणाही केली आहे. या चित्रपटात गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, मियां चांग, ​​राजेश तैलंग आणि सचिन खेडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.