कंगना रणौत बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. गेली अनेक वर्ष तिने विविध पठडीतल्या भूमिका साकारल्या. तर आता ती दिग्दर्शन व निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. आज तिचा ३६ वा वाढदिवस आहे. तिच्या इतक्या वर्षांच्या कारकिर्दीतीत तिला प्रसिद्धी तर मिळालीच पण त्याचबरोबर तिने मोठी संपत्तीही कमावली आहे.

कंगनाचा जन्म १९८७ साली हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे झाला. लहानपणापासूनच तिला अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. पण या गोष्टीला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं. घर सोडल्यानंतर कंगना दिल्लीला गेली आणि तिथे तिने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्यास सुरुवात केली. तिच्या मॉडलिंगच्या करिअर मधूनच तिला मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली.

आणखी वाचा : ‘इमर्जन्सी’ चित्रपट बनवण्यासाठी कंगना रणौतने गहाण ठेवली तिची संपूर्ण मालमत्ता, म्हणाली, “माझ्या मालकीची…”

२००६ साली गँगस्टर या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं आणि तिच्या अभिनयाच्या जोरावर तिला एका पाठोपाठ एक चित्रपट ऑफर होत गेले.

हेही वाचा : इंदिरा गांधींशी स्वतःची तुलना करत कंगना रणौतने व्यक्त केली मनातली भीती, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत तिने अनेक एक से बढकर एक चित्रपटांमध्ये काम केलं. या सर्व चित्रपटांसाठी तिने मोठी रक्कम आकारली. कामाचं कामाने आतापर्यंत तिने कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती ९५ कोटींची आहे. तर प्रत्येक वर्षाला ती १५ कोटी कमावते. त्याचबरोबर आलिशान फ्लॅट्स, महागड्या गाड्या अशी तिची बरीच गुंतवणूक आहे.