बॉलिवूडचे कलाकारदेखील राजकरणात सक्रीय असतात हे आपण पहिलेच आहे. अभिनेत्री कंगनाने काही दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिले की जर तिला हिमाचल प्रदेशमधून लोकसभेसाठी तिकीट दिले तर ती नक्कीच निवडणूक लढण्यास तयार आहे. कंगनानंतर आता मनीषा कोईराला राजकरणात सक्रीय होताना डोसून येणार आहे मात्र भारतातील नव्हे तर नेपाळ देशातील, नुकतीच तिने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मनीषाने आपल्या ट्वीटर अकाउंवरून माहिती दिली आहे ती असं म्हणाली आहे की मी माझ्या कामातून वेळ काढून राष्ट्रीय प्रजातन्त्र पक्षाच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी घरी जात आहे. पक्षाचे तरुणआणि दूरदृष्टी असलेले नेते राजेंद्र लिंगदेन यांच्यासाठी जात आहे. नेपाळमध्ये २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात संसदीय आणि प्रांतीय पातळीवरील निवडणुका होत आहेत.

कोईराला मूळची नेपाळची असून नेपाळचे पहिले निवडून आलेले पंतप्रधान बिश्वेश्वर प्रसाद कोईराला यांची नात आहे. मनीषाने नव्व्दच्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ‘बॉम्बे’, ‘दिल से’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. मनीषाने कॅन्सरसारख्या रोगावर मात करून पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सौदागर’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले मात्र तिला खरी ओळख मिळाली ती विधू विनोद चोप्रा यांच्या ‘१९४२ लव्ह स्टोरी’ या चित्रपटामुळे, तिने ओटीटी विश्वातदेखील पदार्पण केले आहे. चित्रपटांच्या व्यतिरिक्त ती अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेते.