अभिनेत्री विद्या बालन ही बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विद्या सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनयाशिवाय तिचे सोशल मीडियावरील रिल्स व्हिडीओ सुद्धा चर्चेत असतात. दरम्यान विद्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी विद्याचा एका लहान मुलीबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर ही मुलगी विद्याचीच मुलगी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता विद्याने ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे याबाबत खुलासा केला आहे

हेही वाचा- समांथा प्रभू-नागा चैतन्यमध्ये पॅचअप? अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

दरम्यान विद्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तिच्याबरोबर १०-१२ वर्षांची एक मुलगी दिसली होती. विद्या तिचा हाथ पकडून मुंबई विमातळावर घेऊन जाताना दिसली होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर ही मिस्ट्री गर्ल कोण असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. तर काहीनी ही विद्याचीच मुलगी असल्याचा दावाही केला होता. आता या सगळ्या चर्चांवर विद्याने मौन सोडत सपष्टीकरण दिलं आहे. विद्या म्हणाली, ” ती माझी मुलगी नाही तर माझ्या बहिणीची मुलगी आहे. माझ्या बहिणीला जुळी मुलं आहेत. मुलगी इरा आणि मुलगा रुहान”

विद्या बालने २०१२ मध्ये सिद्धार्थ रॉय कपूरबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान काही दिवसांपूर्वी विद्या आपल्या तब्येतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. त्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

हेही वाचा- आलिया भट्टने लग्नात लेहेंग्याऐवजी साडी का नेसली?, अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची नियत चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. आता लवकरच तिचा ‘लव्हर्स’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर इलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.