सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डाने गर्लफ्रेंड लिन लैश्राम हिच्याबरोबर मैतेई परंपरेनुसार लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खानने (Mudassar Khan) गर्लफ्रेंड रिया किशनचंदानी (Riya Kishanchandani) हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्यातल्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.

बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मुदस्सर खानने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. मुदस्सरने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं, “तू या जगातली खूप सुंदर व्यक्ती आहे. माझ्या दोन्ही कुटुंबाचे आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादमुळे आपण एकत्र आलो आहे.” मुदस्सरचे लग्नाचे फोटो पाहून सध्या बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींसह त्याचे चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.

हेही वाचा – “अत्यंत हीन दर्जाच्या…”, बॉडी शेमिंग करणाऱ्यांना केतकी माटेगावकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “तुम्हाला सुद्धा घरात बहिणी, आई…”

लग्नामध्ये खास मुदस्सरने सोनेरी रंगाची जरी असलेला पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि त्यावर मॅचिंग दुपटा असा पेहराव केला होता. तर पत्नी रियाने सोनेरी रंगाची जरी असलेला पांढऱ्या रंगाचा शरारा परिधान केला होता. यावर रियाने ब्रॉड नेकलेस, मांग टीका, अंगठी आणि मॅचिंग कानातले, दागिने घातले होते.

मुदस्सर-रियाच्या या लग्नसोहळ्याला सलमान खानने हजेरी लावली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान मुदस्सरला मिठी मारताना दिसत आहे. यादरम्यान सलमान काळ्या रंगाचा शर्ट आणि पँटमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; कलाकारांनी शेअर केले शेवटचे खास क्षण

मुदस्सरची पत्नी आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुदस्सरची पत्नी रिया किशनचंदानी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘स्वयंवर: मीका दी वोटी’ यांसारख्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती.