प्रसिद्ध रॅपर-गायक बादशाहची गाणी क्लबपासून विवाहसोहळ्यापर्यंत सगळ्या समारंभात आपल्याला ऐकायला मिळतात. कित्येक बॉलिवूड स्टार्सही बादशाहच्या तालावर नाचताना दिसतात. नुकतंच रॅपर बादशाह लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर येत आहेत. ‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार, बादशाहला त्याच्या आयुष्यातील खरे प्रेम सापडले आहे आणि लवकरच तो त्या मुलीबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.

बादशाह गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा रिखीबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. असे सांगितले जात आहे की हे जोडपं लग्नाचा खूप गांभीर्याने विचार करत आहे आणि लवकरच याबद्दल एक मोठी घोषणा करणार आहे. एवढेच नाही तर या महिन्यात हे दोघे लग्न करणार असल्याचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : तृतीयपंथीयांची खिल्ली उडवणाऱ्याला सेलिना जेटलीने सुनावले खडेबोल; म्हणाली, “तुमच्यासारखे लोक…”

आधी बादशाहबरोबर काम केलेल्या म्युझिक लेबलच्या कर्मचाऱ्यानेही या गोष्टीची पुष्टी केली आहे. बादशाहा-ईशा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या गेल्या वर्षी सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या होत्या. मात्र, या जोडप्याने या बातम्यांमागील सत्य सांगितलं किंवा या अफवा खोडून काढण्याचाही प्रयत्न केला नाही. याबाबतीत दोघांनीही अजूनपर्यंत भाष्य केलेलं नाही.

आणखी वाचा : अनुपम खेर यांनी केलेला श्रीदेवीच्या बहिणीचा लूक; व्हायरल फोटो शेअर करत अभिनेता जुन्या आठवणींमध्ये रममाण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बादशाह आता दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार आहे. त्याचे पहिले लग्न जस्मिन मसिहशी झाले होते, जॅस्मिनकडून त्याला एक मुलगीदेखील आहे जीचं नाव जेसामी ग्रेस मसिह सिंग आहे. तिचा जन्म २०१७ मध्ये झाला होता. मात्र २०२० मध्ये हे दोघेही वेगळे झाले. आजपर्यंत त्यांचं वेगळं होण्यामागचं कारण समोर आलेलं नाही.