बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा व पलक आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. आता पलकच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. मेहंदी तसेच हळदी कार्यक्रमाचे पलकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये पलक फारच सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील ग्लो विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.

आणखी वाचा – Video : मान पकडली, टी-शर्ट खेचलं, बराच वेळ अंगावर बसली अन्…; अपूर्वा नेमळेकर व विकास सावंतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

६ नोव्हेंबरला (रविवार) पलक व मिथुनचा विवाहसोहळा पार पडणार आहे. ४ नोव्हेंबरपासून या दोघांच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झाली आहे. मेहंदी कार्यक्रमामध्ये पलकचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. यावेळी तिने आकाशी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तिने परिधान केलेले दागिनेही विशेष लक्षवेधी होते. या लेहंग्यामध्ये पलक अगदी गोड दिसत होती.

पलकच्या मेहंदी कार्यक्रमाला जॅकी श्रॉफ यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी पलकच्या बाजूला बसून स्वतःच्या हातावर मेहंदी काढून घेतली. यादरम्यानचे जॅकी श्रॉफ यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच हळदी कार्यक्रमामध्येही पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून दिसत होतं.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आशिकी २’ चित्रपटामधील ‘चाहूँ मैं या ना’ आणि ‘मेरी आशिकी’ या दोन गाण्यांसाठी पलक मुच्छालने पार्श्वगायन केलं होतं. तेव्हापासून पलक आणि संगीत दिग्दर्शक मिथुन यांच्यामध्ये मैत्री झाली. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर पलक व मिथुनने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.