देशभरात आज लोकसभा निवडणूक २०२४ची मतमोजणी सुरू आहे. भाजपाप्रणित एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडिया आघाडीमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. काही मतदारसंघात भाजपाला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. त्यापैकी एक म्हणजे उत्तर प्रदेश. भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठा फटका बसला असून अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षाचे ३७ आमदार आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवरून अयोध्यावासियांना टोला लगावणारी सोनू निगम नावाच्या व्यक्तीची एक्सवरील पोस्ट व्हायरल होतं आहे. पण या पोस्टमागचं सत्य वेगळंच आहे.

भाजपाला उत्तर प्रदेशातील ८० पैकी ७० जागा जिंकू असा विश्वास होता. शिवाय एक्झिट पोल्समध्येही भाजपा पुन्हा उत्तर प्रदेशात वर्चस्व गाजवणार असा दावा केला होता. यंदा भाजपला ६० ते ७५ जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला होता. पण भाजप ३३ ठिकाणीच आघाडीवर आहे. त्यामुळे सोनू निगम नावाच्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली आहे. पण नाव पाहून अनेकांना वाटलं की ही पोस्ट बॉलीवूड गायक सोनू निगमची आहे, पण तसं नाही. बिहारमध्ये राहणाऱ्या सोनू निगम नावाच्या वकिलाची ही पोस्ट आहे.

हेही वाचा – “माझी प्रिय कंगना…”, बॉलीवूडची ‘क्वीन’ मंडीतून विजयी झाल्यावर अनुपम खेर यांची खास पोस्ट, म्हणाले…

सोनू निगम नावाच्या या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिलं होतं, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्येचा कायापालट केला, नवीन विमानतळ दिलं, रेल्वे स्थानक दिलं, ५०० वर्षांनंतर राम मंदिर उभारून दिलं, एका मंदिराच्या जोरावर अर्थव्यवस्था उभारून दिली, त्या पक्षाला अयोध्या मतदारसंघात संघर्ष करावा लागत आहे. अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब आहे.”

हेही वाचा- रोहित शेट्टीबरोबर पंगा घेणं असिम रियाजला पडलं महाग, थेट ‘खतरों के खिलाडी १४’मधून केलं बाहेर, वाचा संपूर्ण प्रकरण

हेही वाचा – Video: अरे बापरे! संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं झालं अपहरण, नेमकं काय घडलंय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वकील सोनू निगमची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. तसंच सोनू निगमने मांडलेल्या या मतावरून त्याला ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुझ्यासारखे दलाल लज्जास्पद आहेत, जे देशात जातीवाद पसरवत आहेत. देश जात-धर्म नव्हे तर विकासाच्या आधार मतदान करेल.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “पुन्हा पाकिस्तानात जा.” तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “भाजपाने आता विचार करावा की, असे का झाले?”