boney kapoor birthday know about his divorce with mona kapoor and love story with sridevi | आधी बायकोची मैत्रीण, मग बांधली राखी अन्... अशी झालेली बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांची एंट्री | Loksatta

आधी बायकोची मैत्रीण, मग बांधली राखी अन्… अशी झालेली बोनी कपूर यांच्या आयुष्यात श्रीदेवी यांची एंट्री

बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत केलं होतं श्रीदेवी यांच्याशी लग्न

Boney kapoor, boney kapoor birthday, sridevi, mona kapoor, boney kapoor first wife, boney kapoor love story, boney kapoor sridevi, boney kapoor sridevi marriage, boney kapoor sridevi love story, बोनी कपूर, श्रीदेवी, मोना कपूर, बोनी कपूर वाढदिवस
पहिली पत्नी मोना कपूरपासून घटस्फोट ते श्रीदेवी यांच्याशी लग्न या सगळ्यात त्यांचं नाव एकेकाळी चांगलंच गाजलं होतं.

बोनी कपूर हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता आहेत. त्यांनी ‘मिस्टर इंडिया’, ‘नो एंट्री’, ‘जुदाई’ आणि ‘वॉन्टेड’ सारख्या बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली. पण बोनी कपूर फक्त चित्रपटच नाही तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आले होते. पहिली पत्नी मोना कपूरपासून घटस्फोट ते श्रीदेवी यांच्याशी लग्न या सगळ्यात त्यांचं नाव एकेकाळी चांगलंच गाजलं होतं. ११ नोव्हेंबर १९५५ साली जन्मलेले बोनी कपूर आज ६७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात कशी झाली त्यांच्या आणि श्रीदेवी यांच्या गाजलेल्या लव्हस्टोरीची सुरुवात…

बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर असून त्या आज या जगात नाहीत. बोनी कपूर यांनी जेव्हा श्रीदेवी यांना पहिल्यांदा स्क्रीनवर पाहिलं तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते. पण एक वेळ अशीही होती जेव्हा मोना कपूर आणि श्रीदेवी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. दोघींची मैत्री एवढी घनिष्ठ होती की मोना कपूर यांनी श्रीदेवी यांनी आपल्याच घरी राहण्यास जागा दिली होती. त्यावेळी श्रीदेवी मिथुन चक्रवर्ती यांना डेट करत होत्या. दोघांनी १९८५ मध्ये गुपचूप लग्न केल्याचंही बोललं जातं. पण मिथुन चक्रवर्ती यांना शंका होती की बोनी कपूर आणि श्रीदेवी यांच्यात काहीतरी नातं आहे. अशात श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना राखी बांधायला सुरुवात केली होती. याचा खुलासा मोना कपूर यांनी एका मुलाखतीत केला होता.

आणखी वाचा- “३० दिवसात चित्रपट करणारे अभिनेते…”; बोनी कपूर यांचा अक्षय कुमारवर अप्रत्यक्ष निशाणा

बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी श्रीदेवी यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर ते त्यांच्या प्रेमात पडले होते. पण त्यांचं मन जिंकण्यास बोनी कपूर यांना १२ वर्षे लागली. त्याआधी त्याचं श्रीदेवी यांच्यावर एकतर्फी प्रेम होतं. जेव्हा श्रीदेवी ‘चांदनी’ चित्रपटाचं शूटिंग करत होत्या तेव्हा बोनी कपूर त्यांना भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते. तिथून परत आल्यानंतर त्यांनी पत्नी मोना कपूर यांच्याकडे श्रीदेवीवर त्यांचं प्रेम असल्याची कबुली दिली होती. हे ऐकल्यानंतर मोना कपूर खूप दुःखी झाल्या. मोना कपूर एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, “१९ व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. बोनी माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. मी त्यांच्याबरोबरच मोठी झाले. आम्ही जवळपास १३ वर्षे एकत्र घालवली आणि ते एक दिवस म्हणाले की त्यांचं श्रीदेवीवर प्रेम आहे. त्यानंतर आमच्या नात्यात काहीच उरलं नव्हतं. कारण श्रीदेवी गरदोर होत्या.” अशाकत मोना कपूर आणि बोनी कपूर यांनी घटस्फोट घेतला.

आणखी वाचा- “श्रीदेवी माझ्या भावाबरोबर…”; निर्माते बोनी कपूर यांनी सांगितला ‘जुदाई’ चित्रपटातला किस्सा

बोनी कपूर यांना ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात श्रीदेवी यांना कास्ट करायचं होतं. पण श्रीदेवी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोनी कपूर यांच्याकडे कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे त्यांनी थेट श्रीदेवी यांच्या आईशी संपर्क केला. श्रीदेवी यांच्या आईने बोनी कपूर यांच्याकडे जास्त पैशांची मागणी केली आणि बोनी कपूर यांनीही त्याना होकार दिला. चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना आपल्या मनातील भावना सांगितल्या. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढत गेली. अर्थात या दोघांमधील जवळीक पाहून मोना कपूर यांना कधीच त्यांच्या नात्याबाबत शंका आली नाही कारण श्रीदेवी बोनी कपूर यांना भाऊ मानत होत्या. पण जेव्हा त्यांना या दोघांच्या नात्याबद्दल कळलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. मोना कपूर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर बोनी कपूर यांनी १९९६ मध्ये श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. त्यावेळी श्रीदेवी यांना लोक ‘संसार मोडणारी’ असा टॅग दिला होता. मोना कपूर यांच्यापासून बोनी कपूर यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं आहेत, तर श्रीदेवीपासून जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2022 at 09:01 IST
Next Story
उत्तर प्रदेशमध्ये राहताना प्रियांका चोप्राला वाटते भीती; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “संध्याकाळी सातनंतर…”