अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीचा सुपरहिट चित्रपट ‘बंटी और बबली’चा दिग्दर्शक शाद अली सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाद याने कोर्टात धाव घेतली आहे. दिग्दर्शकाने त्याच्या दोन जुन्या सहकाऱ्यांविरोधात स्क्रिप्ट चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शादी अलीच्या जुन्या भागीदारांनी स्क्रीन रायटर्स असोसिएशन आणि अनेक प्रॉडक्शन हाऊसमध्ये शादने लिहिलेली स्क्रिप्ट स्वतःची म्हणून दाखवली असल्याचा दावा दिग्दर्शकाने केला आहे.

‘इंडिया टूडे’च्या रीपोर्टनुसार आपल्या सहकाऱ्यांविरोधात खटला दाखल करण्यासाठी शादने कोर्टात धाव घेतली आहे. शादचे वकील कोर्टात म्हणाले, “माझ्या आशिलाने गेली कित्येक वर्षं त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर मेहनत घेतली आहे, त्यावेळी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या या दोन सहकाऱ्यांनाही ही स्क्रिप्ट दाखवण्यात आली होती. तेव्हा त्या दोघांनी यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा सल्ला दिला व यासाठी त्या दोघांनाही प्रत्येकी ९० हजार रुपयेही देण्यात आले होते.”

आणखी वाचा : इस्रायलवरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणाऱ्यांना स्वरा भास्कर म्हणाली ‘ढोंगी’; पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अभिनेत्रीची पोस्ट

इतकंच नव्हे तर जेव्हा शादने जेव्हा या स्क्रिप्टची चोरी झाली तेव्हा या दोघांना याबाबतीत विचारणा केली तेव्हा उलट या दोघांनी त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी शादकडे ५ कोटी रुपयांचीही मागणी केली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळेच आता शादने या दोघांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाद अलीने ‘बंटी और बबली’बरोबरच ‘साथीया’, ‘ओके जानू’सारख्या सुपरहीट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. २०२२ मध्ये ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचंही दिग्दर्शन शादनेच केलं होतं. या चित्रपटात रितेश देशमुख, जिनीलिया डिसूझा मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता.