जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ला सुरुवात झाली आहे. फ्रान्समध्ये होणाऱ्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील विविध कलाकारांसह दिग्गज व्यक्तिमत्त्व हजेरी लावताना दिसत आहेत. कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
ऐश्वर्या राय-बच्चन ही गेल्या २१ वर्षांपासून कान्स महोत्सवात सहभागी होत आहे. यंदाच्या कान्स महोत्सावासाठी ऐश्वर्या रायने खास लूक केला होता. यावेळी ऐश्वर्याने गाऊन परिधान केला होता. काळा आणि सिल्व्हर रंगाचे हा गाऊन फारच खास वाटत होतो. विशेष म्हणजे या गाऊनला तिने हुडी असल्याप्रमाणे लूक दिला होता. या लूकमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”
ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. यावर एकाने कमेंट करताना म्हटले की, “ती सोलार पॅनलसाठी दिसत आहे आणि त्यासाठीच ती सूर्यापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.” तर एकाने “अल्युमिनियम फॉईलमध्ये पराठा असल्यासारखं”, अशी कमेंट या व्हिडीओवर केली आहे. तिने “आतापर्यंत कान्स महोत्सवात घातलेल्या पोशाखांपैकी सर्वात वाईट पोशाख”, असे एकाने म्हटले आहे.

“ऐश्वर्याचा हा लूक पाहून असं वाटतंय की कोणी तरी गिफ्टचे पॅकिंग केले आहे आणि कान्समध्ये जाऊन रिबीन उघडल्यानंतर ते गिफ्ट समजेल”, अशी कमेंट एकाने केली आहे ऐश्वर्या राय बच्चन २००२ पासून कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. काही वर्षांपूर्वी ऐश्वर्याने आराध्यासह रॅम्पवॉक केला होता. आराध्याही या चित्रपट महोत्सवात सहभागी झाली होती.
दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ ते २७ मे पर्यंत असणार आहे. या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर आतापर्यंत सारा अली खान, मृणाल ठाकूर, उर्वशी रौतेला, ईशा गुप्ता यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी पाहायला मिळाले.